करमाळा प्रतिनिधी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय युवा कामगार सेना पदी आदित्य जाधव यांची निवड करण्यात आली सदर निवड ही एका पत्रकारा द्वारे प्रदेश सचिव अमित भटनागर यांनी केली आहेवंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब व श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या शिफारसीनुसार ही निवड करण्यात आलीनिवडी नंतर जाधव म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारानुसार महाराष्ट्रात आज जे कामगारांचे अडीअडचणी आहेत ते सोडवून व त्यांना न्याय मिळवून देईल व संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात शिवसेना कामगार सेना पोहोचवण्याची जबाबदारी पाळेल व पक्षाचे काम तन मन धनाने करेल असे व जाधव यांनी बोलताना सांगितलेतसेच या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या असून जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…