Categories: करमाळा

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा उत्तम प्रतिसाद 72.78 मतदान

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान उत्साहात पार पडले असून या निवडणुकीसाठी 72.78 इतके मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे . करमाळा नगरपालिकेच्या एक नगराध्यक्ष व 20 नगरसेवकाच्या जागेसाठी मतदान पार पडले असुन एकूण 22,116 मतदारांपैकी 16096 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष 8341 स्त्री 7754 इतर एक मतदार अशी एकूण 16096 मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षीय व अपक्षपणे निवडणूक पार पडली असून यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस याबरोबरच करमाळा शहर विकास आघाडी अपक्ष यांच्यामध्ये ही निवडणूक संपन्न झाली असून शिवसेनेकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा करण्यात आला होता नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी सौ. नंदिनी जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले आहेत. भाजपकडून महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दिदी बागल युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे प्राध्यापक रामदास झोळ सूर्यकांत पाटील यांच्या सहकाऱ्यांने भाजपा नेते कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सौ सुनीता देवी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून सर्व उमेदवार भाजपच्या वतीने निवडणुकीला सामोरे गेले आहेत सावंत गटांनी या निवडणुकीत सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत संजय सावंत एडवोकेट राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल आप्पा सावंत ,भगवान सावंत, दादासाहेब सावंत,गोपाळ बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर विकास आघाडीच्या नावाने या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभे करून मोठे आव्हान उभे केले होते.सावंत गटाच्या शहर विकास आघाडीकडून माजी नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत .यांच्या पत्नी सौ. मोहिनी संजय सावंत यांच्यासह वीस जागी .आपले उमेदवार उभे केले होते नगराध्यक्ष पदासाठी.राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) कडून सौ.भावना भद्रेश गांधी तर अपक्ष प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा अशा प्रकारे एकूण पाच उमेदवार निवडणूक नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सुनिता देवी यांना पाठिंबा देऊन महायुतीमध्ये योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याने आठ जागी नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार झाली असून मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. करमाळा नगराध्यक्ष पदाबरोबर ही बहु-उमेदवारांची लढत मोठी रंगतदार झाली असून निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार असल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निकालाची धाकधूक लागली आहे. मतदार राजांनी आपला हक्क उत्साहामध्ये बजावला असून मतदार राजा नक्की कोणाला कौल देतो हा २१ डिसेंबरला निकाल लागल्यावर आपणास समजणार आहे.करमाळा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मतदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी कृष्णा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी यशस्वीपणे चोख बंदोबस्त ठेवला होता.करमाळा नगरपालिकेचे निवडणूक मतदान यशस्वीपणे संपन्न झाले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

इंटरनेट सेवा देण्याच्या नावाखाली केबल साठीचे नियमबाह्य खोदकाम जीवावर बेतले: अ‍ॅड बालाजी इंगळे गंभीर जखमी ! ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सतीश निळ यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…

2 hours ago

करमाळ्यातील एकलव्य आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था

करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…

3 hours ago

करमाळ्यात हनुमान चालीसा पठणाचे 151 आठवडे पूर्ण; भक्तीचा अभूतपूर्व जल्लोष

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…

9 hours ago

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

2 days ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

2 days ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

3 days ago