Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. विकास नामदेव पाटील यांची निवड


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी आणि आर्थिक स्थिती भक्कम असलेल्या वांगी बृहत विविध कार्यकारी सेवा सहकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. विकास नामदेव पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदी सौ. मंगल महादेव जाधव यांची गुरुवार ४  डिसेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मकाईचे संचालक श्री युवराज रोकडे,श्री.गणेश तळेकर मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, मार्केट कमिटीचे माजी सदस्य श्री बापूराव रणसिंग , आदीनाथ चे संचालक श्री दत्ताबापू देशमुख,श्री.रामेश्वर तळेकर, माजी संचालक श्री. भारतराव साळुंखे, श्री.पांडूरगं जाधव, वांगी चे माजी सरपंच श्री.विठ्ठल शेळके, वांगी सोसायटी चे माजी चेअरमन श्री.साहेबराव रोकडे, डॉ. विजय रोकडे , रविराज देशमुख वांगी सोसायटी सदस्य नानासाहेब भानवसे , नामदेव महाडीक, बबन गोडसे, दिनकर रोकडे , नितीन देशमुख,आप्पासाहेब भोसले ,उमेश पाटील,सौ. साधना मंगवडे , भैरवनाथ बंडगर , सामाजिक कार्यकर्ते श्री.अर्जुन तकीक, संपत देशमुख, शिवराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य तानाजी देशमुख, नाना तकीक ,शंकर जाधव, उपसरपंच डॉ भाऊसाहेब शेळके, कृष्णा जाधव, आप्पासाहेब चौगुले, ढोकरीचे मा. ऊपसरपंच हिराजी चौगुले, सुनिल सांगवे, सुधीर बापू देशमुख, पृथ्वीराज देशमुख संजय देशमुख वैभव पाटील तेजस पाटील विशाल मोरे , बाळासाहेब सर्जेराव देशमुख , विशाल रोकडे, बाळासाहेब रोकडे युवा उद्योजक लक्ष्मण भाऊ गोडसे , शिवराज रोकडे आदि मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयातील उमेश बेंढारी आणि संस्थेचे सचिव दत्तात्रय शिर्के यांनी कामकाज पाहिले.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

16 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

18 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago