या पर्यटन विकास आराखड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनासाठी एकूण २५ कोटी निधीला मंजुरी मिळालेली होती. त्यातील ५ कोटी निधीची कामे करमाळा तालुक्यातील कमला भवानी मंदिर परिसरात केली जाणार आहेत. सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे कमलाभवानी मंदिर राज्याच्या, देशाच्या पर्यटन नकाशामध्ये आता झळकेल असा विश्वास माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला.
५ कोटी निधीपैकी २ कोटी २० लक्ष निधीमधून श्री कमलादेवी मंदिरात सीसीटीव्ही देखरेख प्रणाली, ऑन ग्रिड सोलर रूफ टॉप सिस्टम, स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट, गार्डन लाईट, विद्युतीकरणाचे काम आणि संगीतमय कारंजे ही कामे केली जाणार आहेत.तर २ कोटी ८० लक्ष निधीमधून मंदिर सुधारणेची कामे केली जाणार आहेत.
चौकट
यापूर्वी मिळालेल्या ४ कोटी निधीची कामे पूर्णत्वास.
श्री.कमलाभवानी हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आहे .हे देवस्थान करमाळा शहराच्या लगत असून या देवस्थानचा विकास करण्यासाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी ४ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पेविंग ब्लॉक बसविणे – २४ लाख, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे – ७६ लाख, रस्ते डांबरीकरण करणे – ४७ लाख ,भक्तनिवास बांधणे – ८० लाख ,महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छतागृह बांधणे – २१ लाख ५० हजार ,वॉल कंपाऊंड बांधणे -१ कोटी ४३ लाख, स्ट्रीट लाईट बसविणे -१५ लाख ही कामे पूर्ण झालेली आहेत.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…