Categories: करमाळा

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितलेला फॉर्म्युला रिटेवाडी उपसा सिंचनकरिता फायदेशीर.. चांडगाव ते पोमलवाडी पुलाचे कामाला ही लवकरच मंजुरीची प्रतिक्षा!- ॲड. अजित विघ्ने( प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा) यांची माहिती

* करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विकासकामांसाठी नागपुर हिवाळी अधिवेशनातुन बऱ्याच विकासकामांवर चर्चा होताना दिसत आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे हे सुद्धा नागपुरात तळ ठोकुन असुन, महायुती सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे त्यांनी अनेक विकासकामांचा पाठपुरावा केलेला असुन, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सहकार्यातुन व संकल्पनेतुन लवकरच चांडगाव ता- इंदापुर ते पोमलवाडी ता- करमाळा या नविन ब्रिज चे काम मंजुरीचे प्रतिक्षेत आहे. याकरिता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सततचा पाठपुरावा केलेला असुन या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण पुल लवकरच साकारणार असल्याचे ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले. डिकसळ ते कोंढार चिंचोली पुलासही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे माध्यमातुन निधी प्राप्त झाला होता व त्याचे काम चालु आहे. सदरचे काम संथ गतीने होत असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर नाराजी व्यक्त होत असुन हे कामही वाढीव निधीसह लवकरच चालु करणेबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे हे प्रयत्नशील आहेत. वस्तुतः करमाळा तालुक्यातील महत्वपूर्ण रिटेवाडी उपसा सिंचन योजने बाबतचा आराखडा माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सादर केला असुन सदर आराखडा स्विकारला तरच ही योजना मार्गी लागणार आहे. कुकडीतील अतिरिक्त पाणी उजनीत आणुन ही योजना मार्गी लागु शकते व याबाबत अभ्यासपूर्ण माहिती माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पुर्वीच सादर केलेली आहे. करमाळा देवीचा माळ येथील कमलादेवी मंदिराला ५ कोटी निधी प्राप्त झालेला असुन त्यामुळे महायुती सरकारकडून करमाळ्याच्या विकासकामासाठी अग्रेसर राहुन विविध विकासकामे माजी आमदार संजयमामा शिंदे निश्चितपणे आणतील याबाबत खात्री राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago