Categories: करमाळा

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी क्षेत्रांमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या समारंभास प्रमुख उपस्थिती विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय विलासरावजी घुमरे सर व विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य मिलिंदजी फंड यांची होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अभिमन्यू पी. माने हे होते. यावेळी एन.सी.सी. विभागातील एकूण दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यापैकी नऊ विद्यार्थी हे अग्नीवीर मध्ये भरती झाले व कॅडेट रावसाहेब गव्हाणे वायुसेना मध्ये भरती झाला. अग्निवीर भरती झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॅडेट सुमित घाडगे, शुभम शिंदे, संघर्ष उबाळे, राजेश गोरे, प्रतीक साळवे, प्रदीप फाटके प्रदीप फाटके, ज्ञानेश्वर गुंड ,अमर देवरे यांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयातील बी.ए. भाग तीन मधील शेवटच्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या इरफान पठाण याची मुंबई पोलीस येथे निवड झाली. यावेळी नुकतेच आर्मी अग्निवीरचे ट्रेनिंग घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांनी ‘एन.सी.सी. हे देशसेवा व करियर घडवण्याचे माध्यम आहे.’ असे मत व्यक्त. करून या विद्यार्थ्यांशी प्रशिक्षणाबद्दल हितगुज केले व त्यांचे कौतुक केले. तसेच संस्थेचे प्राचार्य मिलिंदची फंड सर यांनी प्रशिक्षणास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व उपस्थित असलेल्या सर्व एन.सी.सी. कॅडेट्सना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षपदावरुन बोलताना डॉ. अभिमन्यू माने सर यांनी कॅडेट्सला संस्थेच्या सचिवांचा व अध्यक्षांचा एन.सी.सी. विभागास असणारा सहकार्य आणि भक्कम पाठिंबा कसा व किती आहे हे उदाहरण देऊन सांगितले. तसेच एन.सी.सी. कॅडेट्स ला होणारा फायदा व महत्त्व सांगितले. यावेळी भरती झालेल्या कॅडेट सुमित घाडगे व रावसाहेब गव्हाणे यांनी मनोगते व्यक्त केली. व प्रशिक्षण घेऊन आलेला अग्नीवीर समर्थ वीर यांनी देखील आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी. विभागाचे प्राध्यापक राम काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अभिषेक करकुटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार कॅडेट कु. संस्कृती कांबळे हिने मानले. कार्यक्रमास एनसीसी विभागाच्या प्रमुख कॅप्टन विजया गायकवाड, निलेश भुसारे व एनसीसी कॅडेट यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago