Categories: करमाळा

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

 

करमाळा प्रतिनिधी 
भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे संगणकशास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले प्रा. शरद भरत जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यावतीने संगणकशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

“Hybrid Machine Learning Technique for Person Identification using Multimodal Palmprint, Ear and Face Biometric Features” या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर करून आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना संगणकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.डॉ. जाधव यांच्या संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग व डीप लर्निंग आधारित मल्टी-मॉडल बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली असून, व्यक्ती ओळख पटविण्याच्या क्षेत्रात अधिक अचूकता साध्य करण्यात यश मिळाले आहे.डॉ. जाधव हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगणक विज्ञान संघटनांचे सदस्य असून स्प्रिंजर, वर्ल्ड सायंटिफिक यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. आजवर त्यांचे ११ संशोधन लेख प्रसिद्ध झाले असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधपत्रांचे सादरीकरण केले आहे.त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना युवा संशोधक पुरस्कार, करमाळा रत्न सन्मान, उत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार व प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच संशोधनाच्या कालावधीत त्यांना महाराष्ट्र शासनाची सारथी – राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय फेलोशिप प्राप्त झाली होती.या उल्लेखनीय यशाबद्दल करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार जयवंतराव जगताप, विश्वस्त वैभवराजे जगताप, शंभुराजे जगताप, तसेच महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. शरद जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

24 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago