Categories: करमाळा

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी करीत उपविजेते होण्याचा सन्मान राखला. सर्व सामने अतिशय चुरशीने खेळलेल्या करमाळा वकील संघाचे विशेष कौतुकही करण्यात आले. उपविजेते पदासह बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच सिरिज ॲड. विश्वजित बागल यांना तर ॲड. माऊली टापरे यांनाही दोन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी चा सन्मान मिळाला. या संघात ॲड. अमर शिंगाडे, ॲड. शिवराज शेरे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. निखिल पाटील, ॲड. विश्वजित बागल, ॲड. माऊली टापरे, ॲड.स्वप्नील यादव, ॲड. ओंकार मुसळे, ॲड. किरण वीर, ॲड. विशाल घोलप, ॲड. प्रियाल आगरवाल,ॲड. मनोज कांबळे, श्री. शशिकांत शेजुळ, अमोल राऊत, मार्गदर्शक ॲड. सुहास मोरे यांचे सह करमाळा संघाचे पदाधिकारी व क्रिकेट प्रेमींची विशेष उपस्थिती होती. अतिशय खेळीमेळीत झालेल्या सामन्यात बॉलिंग मधे विशाल घोलप,अमर शिंगाडे, शिवराज शेरे, विश्वजित बागल यांचे विशेष कौतुक करण्यात आले. अंतिम सामन्यानंतर ॲड.मिलिंदजी थोबडे,ॲड.भारत कट्टे, ॲड.उमेश मराठे,सोलापुर बारचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड.आळंगे,ॲड. चिंचोळकर मॅडम, ॲड.देशमुख मॅडम, आयोजक ॲड. रितेश थोबडे व सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago