Categories: करमाळा

नाव नाही, एक चळवळ आहे : मोनिका पवार सरकार

करमाळा प्रतिनिधी प्रामाणिकपणा, धाडस, जिद्द आणि समाजासाठी झटण्याची अपार ऊर्जा यांचा संगम म्हणजे मोनिका पवार-सरकार. गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडपणे समाजसेवेचा वसा जपत असलेल्या या कर्तृत्ववान महिलेला नागरिक प्रेमाने “साजसेविका” म्हणून ओळखतात. ही ओळख केवळ नावापुरती मर्यादित नसून, त्यांनी माणुसकीच्या नात्याने जपलेल्या असंख्य जीवनकथांची ती साक्ष आहे.सौ. मोनिका पवार-सरकार यांचे समाजकार्य कोणत्याही पदाच्या चौकटीत अडकलेले नाही. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत अनेक समस्या मार्गी लावल्या. केवळ आपल्या प्रभागापुरतेच नव्हे, तर शहरातील विविध भागांतील नागरिकांच्या अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा त्यांनी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला.महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. घरगुती हिंसाचार, कौटुंबिक वाद व अन्यायकारक वागणुकीच्या अनेक प्रकरणांत त्या पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन आणि प्रशासनाशी समन्वय साधत अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचे धाडसी कार्य त्यांनी केले आहे.केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM SVANidhi) अंतर्गत फेरीवाले, छोटे व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्या घटकांना कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. तसेच उज्ज्वला गॅस, घरकुल, शौचालय, आरोग्य व महिलांसाठीच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली.स्वावलंबन हाच खरा सन्मान या विचारातून त्यांनी महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या. गरजू व निराधार महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे अनेक महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.कोरोना महामारीच्या भीषण काळात मोनिका पवार-सरकार या माणुसकीचा आधार ठरल्या. लॉकडाऊनच्या काळात गरजू, गरीब, मजूर व निराधार कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्या काळात अनेक कुटुंबांसाठी त्या देवदूत ठरल्या.घरगुती वादांत समेट घडवून आणणे, तुटणाऱ्या नात्यांना जोडणे आणि समाजात सलोखा निर्माण करणे हेही त्यांच्या समाजकार्याचे महत्त्वाचे अंग आहे. हातात कोणतीही सत्ता नसतानाही हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आधार देणारे हे नाव आज विश्वास, संवेदना आणि सेवाभावाचे प्रतीक बनले आहे.म्हणूनच ठामपणे म्हणावे लागेल — मोनिका पवार-सरकार हे नाव नाही, ती एक चळवळ आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

13 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

1 day ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago