Categories: Uncategorized

भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस वितरणासाठी नवीन नियम लागू बुकिंग, ऑनलाइन पेमेंट व OTP प्रणाली अनिवार्य

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील भारत गॅस एजन्सीमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरण प्रक्रियेत अलीकडे महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसह वितरणातील पारदर्शकता आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आल्याची माहिती एजन्सी प्रशासनाने दिली आहे.नवीन नियमानुसार, सर्व घरगुती गॅस ग्राहकांना सिलेंडर बुकिंग करणे अनिवार्य करण्यात आले असून, बुकिंग केवळ ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच करावे लागणार आहे. ग्राहक 7710955555 या अधिकृत क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहजपणे सिलेंडर बुकिंग करू शकतात. बुकिंग यशस्वी झाल्यानंतर संबंधित माहिती SMS द्वारे ग्राहकाला प्राप्त होणार आहे.याशिवाय, Hello BPCL App, 08045163554 या क्रमांकावर कॉल करून बुकिंग व पेमेंट, तसेच PhonePe, Google Pay, Amazon Pay यांसारख्या UPI माध्यमांद्वारे Book & Pay सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व ग्राहकांनी स्वतःच बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, मध्यस्थ किंवा इतर कोणावरही बुकिंगची जबाबदारी सोपवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, सिलेंडर वितरण प्रक्रियेत OTP (वन टाइम पासवर्ड) प्रणाली लागू करण्यात आली आहे. सिलेंडर बुकिंगनंतर वितरणासाठी वेळ निश्चित झाल्यावर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर ६ अंकी OTP (डिलिव्हरी कोड) SMS द्वारे पाठवण्यात येतो. हा OTP डिलिव्हरी कर्मचारी प्राप्त केल्यानंतरच सिलेंडर वितरण पूर्ण होणार आहे. त्यामुळे वितरणात पारदर्शकता येणार असून चुकीचे किंवा बनावट वितरण रोखण्यास मदत होणार असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे.

फोनधारक व्यक्ती वितरणावेळी घरी उपस्थित नसल्यास, प्राप्त OTP घरातील इतर सदस्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून सिलेंडर वितरणात विलंब किंवा गैरसोय होणार नाही. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती कारणांसाठीच करावा, व्यावसायिक किंवा इतर कोणत्याही वापरासाठी सिलेंडर वापरणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.तक्रारींसाठी 14.2 व 19 किलो क्षमतेच्या सिलेंडर वितरणाबाबत डिलिव्हरी मॅनेजर बापू शिरसाट (मो. 93705 42124) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच गॅस उपकरणे व दुरुस्ती संदर्भातील सेवांसाठी मेकॅनिक मॅनेजर सचिन मडके (मो. 95278 48490) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थेट मेकॅनिकशी संपर्क साधल्यास होणारा विलंब किंवा अतिरिक्त शुल्काची जबाबदारी एजन्सीची राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.या नवीन नियमांमुळे गॅस वितरण व्यवस्था अधिक सुरक्षित, सुलभ व पारदर्शक होणार असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी, करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

सोगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार शिंदे गटाच्या सरडे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…

13 hours ago

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची सुवर्णभरारी 57 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थ्यांनी मिळवले मानाचे यश; गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा  प्रतिनिधी: करमाळा शहरातील मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन…

19 hours ago

खोलेश्वर महादेवाला पावसासाठी साकडे नगराध्यक्ष मोहिनी सावंत व नगरसेवक संजय सावंत दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अभिषेक तीन दिवसांचा धार्मिक उपक्रम

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…

2 days ago

आदिनाथचा लिलाव ही तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना : संचालक डॉ.अमोल घाडगे

* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…

2 days ago

सरकार मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी* *स्वरांजली ऑर्केस्ट्रा’च्या सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत; विविध उपक्रमांनी गणेशोत्सवाची सांगता

करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…

2 days ago

सरकार मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी ढोल-ताशांचा गजर भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…

2 days ago