*
*करमाळा प्रतिनिधी :
करमाळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीने दणदणीत व ऐतिहासिक विजय मिळवत शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. कोणत्याही राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षाचा अधिकृत पाठिंबा नसतानाही, सर्वसामान्य नागरिकांच्या बळावर लढवण्यात आलेल्या या निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ. मोहिनी संजय सावंत यांनी १,८४० मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले.
सौ. मोहिनी सावंत यांनी एकूण ६,५२० मते मिळवली. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या सौ. सुनीता कन्हैयालाल देवी यांना ४,६८० मते, तर शिवसेनेकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी सौ. नंदिनी जगताप यांना ४,५५७ मते मिळाली. मात्र मतदारांनी स्पष्टपणे विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत करमाळा शहर विकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला.
मोठ्या पक्षांचा प्रचार; तरीही जनतेचा कौल वेगळा
या निवडणुकीत भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे, युवा नेते दिग्विजय बागल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, प्रा. रामदास झोळ यांचे मार्गदर्शन व प्रचार लाभला होता. तसेच करमाळा नगरपरिषद भाजपने दत्तक घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते.
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांना जाहीर पाठिंबा होता. मात्र एवढ्या मोठ्या राजकीय ताकदीसमोरही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठबळावर उभी असलेली करमाळा शहर विकास आघाडी अधिक प्रभावी ठरली आहे.
पहिल्याच निवडणुकीत
करमाळा शहर विकास आघाडीने पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्षपदासह एकूण ९ जागांवर विजय मिळवून राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. या यशस्वी आघाडीचे नेतृत्व सुनील बापू सावंत, संजय आण्णा सावंत व ॲड राहुल सावंत यांनी केले. तसेच विठ्ठल आप्पा सावंत, भगवान सावंत, दादा सावंत व गोपाळ बापू सावंत यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.
करमाळा नगरपालिकेवर तब्बल तीस वर्षे सत्ता गाजवणाऱ्या जगताप गटाला या निवडणुकीत जनतेने स्पष्ट नकारात्मक कौल दिला आहे. तसेच भाजपच्या वतीने निवडणूक लढवणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले. भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, वैभव जगताप, माजी नगरसेवक राहुल जगताप, प्रविण जाधव, रवि कांबळे, अल्ताफ तांबोळी, श्रेणिक खाटेर यांच्या पत्नी सौ संगीता खाटेर तसेच माजी नगरसेवक श्रीनिवास कांबळे यांचे पुत्र निलेश कांबळे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पक्षनिहाय जागांचे चित्र
करमाळा शहर विकास आघाडी – ९ जागा
भारतीय जनता पार्टी – ७ जागा
शिवसेना – ५ जागा
विकासाच्या मुद्द्यावर जनतेने क्रॉस व्होटिंग करत तिन्ही गटांना प्रतिनिधित्व दिले असले, तरी नेतृत्वाची सूत्रे सावंत गटाच्या हाती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
करमाळा नगरपरिषद : विजयी उमेदवारांची आकडेवारी (वार्डनिहाय)
वार्ड १
रवि जाधव – 1028 मते (शहर विकास आघाडी)
सौ जबीन मुलाणी – 1057 मते (शहर विकास आघाडी)
वार्ड २
संजय (पप्पू) सावंत – 1416 मते (शहर विकास आघाडी)
सौ. ज्योत्स्ना लुणिया – 1057 मते (शहर विकास आघाडी)
वार्ड ३
सचिन गायकवाड – 895 मते (भाजप)
सौ.पुजा दादा इंदलकर – 702 मते (शहर विकास आघाडी)
वार्ड ४
सौ. स्वाती फंड – 1010 मते (भाजप)
अतुल फंड – 1231 मते (भाजप)
वार्ड ५
सौ साजेदा अहमद कुरेशी – 493 मते (शिवसेना)
विक्रमसिंह परदेशी – 678 मते (शहर विकास आघाडी)
वार्ड ६
सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट – 705 मते (शिवसेना)
प्रशांत ढाळे – 934 मते (शिवसेना)
वार्ड ७
युवराज चिवटे – 735 मते (शिवसेना)
सौ. अश्विनी अब्दुले – 919 मते (शिवसेना)
वार्ड ८
सौ. सुनीता ढाणे – 825 मते (भाजप)
दीपक चव्हाण – 495 मते (भाजप)
वार्ड ९
सौ. लता घोलप – 546 मते (भाजप)
सौ. सचिन घोलप – 546 मते (भाजप)
वार्ड १०
संदीप कांबळे – 610 मते (शहर विकास आघाडी)
सौ. चैत्राली सावंत – 646 मते (शहर विकास आघाडी)
सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतल्याचे स्पष्ट झाले असून, करमाळा नगरपालिकेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी या मातब्बर पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवत करमाळा शहर विकास आघाडीने मोठा विजय मिळवत सावंत गटाला भरघोस मतदान करून आशीर्वाद दिल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी मतमोजणीची चोख व्यवस्था ठेवली असल्याने मतमोजणी शांततेत पार पडली आहे मतमोजणी दरम्यान निकाला नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…