Categories: करमाळा

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचे हरिद्वार येथे रामदेव बाबांच्या सहवासात मुख्य योग शिक्षक प्रशिक्षण पूर्ण करमाळा तालुका योगमय करण्याचा संकल्प

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांची स्वामी रामदेव बाबा यांच्या सानिध्यात पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे झालेल्या मुख्य योग शिक्षक प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातून एकमेव निवड करण्यात आली होती.
ही निवड राज्य युवा प्रभारी मा. श्री प्रितेशजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी सुरेंद्रजी पिसे, जिल्हा संवाद प्रभारी मधुकरजी सुतार, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी भगवानजी बनसोडे, कोषाध्यक्ष रघुनंदनजी भुतडा व जिल्हा सहप्रभारी संतोषजी दुधाळ यांनी केली होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यातच प्राचार्य नरारे यांची भारत स्वाभिमानचे तालुका प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
डिसेंबर २०२५ दरम्यान पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे एक आठवड्याचे मुख्य योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. योग व ज्ञानामृताच्या प्रवाहात राहण्याचा हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य नरारे यांनी सांगितले.
या प्रशिक्षण कालावधीत श्रद्धालयम् या मानवसेवेच्या महायज्ञाला भेट देण्याची संधी मिळाली. येथे दररोज विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ओपीडी सेवा सुरू असून साध्या सर्दी-खोकल्यापासून ते बीपी, शुगर, सांधेदुखी, त्वचारोग तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपर्यंत सर्वसमावेशक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. योग, आयुर्वेद, नैसर्गिक चिकित्सा व आधुनिक संशोधन यांच्या समन्वयातून लाखो रुग्ण निरोगी जीवनाकडे वाटचाल करत आहेत.
पतंजली योग ग्राम, गोरक्षण येथेही भेट देण्याचा योग आला. सध्या पतंजली योगपीठात ५०० पेक्षा अधिक विविध थेरपी कार्यरत असून त्या अत्यल्प खर्चात सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. “स्वस्त, सुलभ आणि सर्वांसाठी आरोग्य” हे ध्येय प्रत्यक्षात साकारत पतंजली योगपीठ आज जागतिक स्तरावर आदर्श ठरत आहे.
विशेष म्हणजे योगशिक्षक, तहसील व जिल्हा प्रभारी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी ५० टक्के सवलतीत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पतंजली योगपीठाचा हा उपक्रम म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर मानवतेच्या सेवेस अर्पण केलेले तपस्वी कार्य आहे.
करमाळा येथील ध्यान, योग साधना व सेवा केंद्राचे प्राचार्य बाळासाहेब नरारे हे मुख्य संचालक असून दररोज पहाटे साडेपाच ते पावणे सात या वेळेत महिला व पुरुषांसाठी मोफत योग वर्ग घेतला जातो. या माध्यमातून अनेक आजारांवर यशस्वी उपचार होत आहेत.
स्वामी रामदेव बाबा यांचा “करो योग, रहो निरोग” हा संदेश करमाळा तालुक्यात घराघरात पोहोचवून संपूर्ण तालुका योगमय करण्याचा संकल्प भारत स्वाभिमान चे तालुका प्रभारी प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

11 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago