करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण व खडकेवाडी येथे शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्यांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी तसेच दैनंदिन दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर गणेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विविध विकासकामे मंजूर करून आणली असून, त्याचे उद्घाटन व भूमिपूजन सध्या तालुक्यातील विविध गावांमध्ये होत असल्याचे चित्र आहे,
भूमिपूजनप्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले, “विट जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे मंजूर करून आणली आहेत. येणाऱ्या काळात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री नामदार जयकुमारजी गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने या गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवरील रस्त्यांच्या समस्या तसेच इतर मूलभूत अडचणी कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.”
या रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत नेणे सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना, महिला व ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळात विट जिल्हा परिषद गट गणेश चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, नूतन नगरसेवक रामभाऊ ढाणे, भाजप तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे, गणेश महाडिक यांच्यासह मिरगव्हाण व खडकेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…