Categories: कृषी

शिक्षण, संघर्ष आणि समाजसेवेची जिवंत मशाल : रेखा सोनकवडे

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी (जि. सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे या केवळ शिक्षिका किंवा प्रशासक नव्हत्या, तर त्या ग्रामीण समाजासाठी उभ्या राहिलेल्या आधारवड होत्या. अलीकडेच त्यांची बदली खैराट येथील शाळेत झाली असली, तरी वागदरी आणि परिसरातील जनतेच्या मनात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले आहे. रेखा सोनकवडे यांचे व्यक्तिमत्त्व हे शिक्षण, सामाजिक बांधिलकी, विज्ञानवादी विचार आणि कृतीशील मानवतेचे अद्भुत मिश्रण आहे. महिला, युवक, असंघटित कामगार, बेरोजगार, दलित, पीडित, वंचित, निराधार आणि निराश्रित घटकांसाठी त्या नेहमीच आशेचा किरण ठरल्या. अन्यायग्रस्तांसाठी उभे राहणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे हे त्यांनी कधीच केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर जीवनमूल्य म्हणून स्वीकारले. झाडू हातात घेणारी आधुनिक योगिनी“मुख्याध्यापिका” ही केवळ खुर्ची नव्हे, तर जबाबदारी आहे, हे रेखा सोनकवडे यांनी कृतीतून दाखवून दिले. शाळेतील स्वच्छतागृहे, परिसर, वर्गखोल्या या स्वच्छ ठेवण्यासाठी त्या स्वतः झाडू, खराटा, कधी ब्रशही हातात घेऊन उभ्या राहत. आधुनिक काळातील या योगिनी आहेत. त्यांनी श्रमप्रतिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. त्यांच्या या कृतीमुळे स्वच्छता ही कामगारांची जबाबदारी नसून समाजाची सामूहिक नैतिकता आहे, हा संदेश पोहोचला.
………….
साहित्यिक मन, संवेदनशील लेखणी
रेखा सोनकवडे या साहित्यिक वृत्तीच्या शिक्षिका आहेत. कविता, कथा, लेखसंग्रह अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण वास्तव, स्त्रीसंघर्ष, शिक्षणातील विषमता आणि माणुसकीची ऊब प्रकर्षाने जाणवते. लवकरच त्यांच्या नावावर आधारित ‘रेखाक्षर’ हे पुस्तक प्रकाशित होत असून, सोलापूर येथील एका पत्रकाराने हे पुस्तक लिहिले आहे. सध्या त्याची मांडणी अंतिम टप्प्यात आहे.
………….
राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
रेखा सोनकवडे यांच्या कार्याची दखल देशपातळीवरही घेण्यात आली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रेखा सोनकवडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून, ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील निष्ठावान शिक्षकांच्या कार्याचा गौरव होता.
……………
कोरोना काळातील धगधगती निष्ठा
कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक यंत्रणा ठप्प झाल्या, मात्र रेखा सोनकवडे थांबल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, सुरक्षित अंतर ठेवून, परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. विशेषतः गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण थांबू नये, यासाठी त्यांनी घेतलेली धडपड ही खऱ्या अर्थाने शिक्षकधर्माची प्रचीती देणारी होती. विरोधाला न जुमानता पुढेच चालत राहिल्यात्यांच्या प्रगत, समाजाभिमुख आणि प्रयोगशील कार्याला शिक्षणाच्या प्रवाहातील काही घटकांनी विरोधही केला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाप्रमाणे, शेणाचे शिंतोडेही फुलांचा वर्षाव समजून त्या कार्यरत राहिल्या. ही तुलना अतिशयोक्ती नसून त्यांच्या कार्याचा स्वभाव सांगणारी आहे.
………..
सीमारेषा न मोडता घडवलेले मोठे कार्य
मूळच्या लातूर जिल्ह्यातील असलेल्या रेखा सोनकवडे या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील वागदरी गावात विवाहबद्ध झाल्या. योगायोगाने पतीही शिक्षक आदरणीय लक्ष्मण सोनकवडे. समाजकार्य, शिक्षण आणि ज्ञानार्जनाच्या वाटेवर चालताना पतीने कधीही ‘सीमारेखा’ आखली नाही, आणि रेखा सोनकवडे यांनीही तत्त्वनिष्ठा, प्रयोगशीलता आणि विज्ञानवादी विचारांच्या सीमारेषा कधी ओलांडल्या नाहीत. या समन्वयातूनच त्यांचे मोठे कार्य उभे राहिले.
………..
मान्यवरांची प्रत्यक्ष दखल
त्यांच्या कार्याची दखल केवळ औपचारिक सत्कारापुरती मर्यादित राहिली नाही. तत्कालीन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मालदार सर (आताचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांनी स्वतः त्यांच्या शाळेत जाऊन गौरव केला, त्यांच्या कार्याचा आदर केला आणि त्यांच्या घरी जाऊन पाहुणचार स्वीकारला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील अनेक मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्र्यांनी वैयक्तिक पातळीवर त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
………..
निष्कर्ष
रेखा सोनकवडे या शिक्षणव्यवस्थेतील एक व्यक्ती नाहीत, तर त्या एक चळवळ आहेत. ग्रामीण भागातील पीडित, वंचित, अत्याचारित मुली आणि महिलांसाठी त्यांनी उभे केलेले कार्य हे आजच्या काळात प्रेरणादायी आहे. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे, हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याने सिद्ध केले आहे. सध्या त्या महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा म्हणून कार्य करत अाहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

औदुंबरराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! बंद पडलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी पुन्हा धावणार; परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने ग्रामीण भागाला दिलासा

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी बस सेवा…

19 hours ago

करमाळ्यात १० किलो गांजासह युवक जेरबंद ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईत करमाळा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, १०…

2 days ago

नुकसानीचे पंचनामे व वीज पुरवठा पूर्ववत ठेवणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन…

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप…

4 days ago

आठ दिवसांत नेरले–गौंडरे रस्त्याचे काम सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

करमाळा प्रतिनिधी  नेरले, ता. करमाळा : नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी…

4 days ago

करमाळ्यात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या…

4 days ago