आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)कडून करमाळा तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात आला असून, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आढावा बैठकांची मालिका सुरू केली आहे.
शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी बोरगाव, रावगाव, वीट व हिसरे या गावांमध्ये पांडे जिल्हा परिषद गट, वीट जिल्हा परिषद गट तसेच संबंधित गणांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत निवडणूक तयारी, संघटन मजबूत करणे व स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत प्राथमिक चाचपणी करण्यात आली.
यावेळी अनेक नवे कार्यकर्ते व स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे चित्र दिसून आले. अशा कार्यकर्त्यांना सन्मानाने पक्षात सामावून घेण्याचे धोरण असल्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा व आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पराभव झाला असला, तरी संजयमामा शिंदे गटाला सुमारे ४२ टक्के मतदान मिळाले असून, यावरून तालुक्यातील जनाधार कायम असल्याचा दावा करण्यात आला. विरोधक केवळ टीका व आरोप करण्यात व्यस्त असून विकासाच्या बाबतीत ते मागे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कोणावरही टीका न करता करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा घेऊन पुढे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिवसेंदिवस वाढता लोकसमर्थन मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत देण्यात आले.
निवडणुका लांबल्या असल्या तरी कार्यकर्ते पूर्णपणे सज्ज असून, यावेळी बहुरंगी लढती पाहायला मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. समविचारी गटांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिल्या.
केम, कोर्टी, वांगी व चिखलठाण जिल्हा परिषद गटांमध्येही लवकरच आढावा बैठका होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे व प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी दिली.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…