Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वसामान्यातील एक असामान्य युवा नेतृत्व-ॲड.अजित विघ्ने

* करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर गावचे युवक नेतृत्व ॲड.अजित विघ्ने हे एक अभ्यासु आणि दिलदार व्यक्तिमत्व असुन,सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या या युवा नेत्याला मानणारा मोठा वर्ग करमाळा तालुक्यात दिसुन येतो. वकीली व्यवसायाबरोबरच समाजकारण, राजकारण,शेती व्यवसायाशी ते निगडीत आहेत. लेखनाची त्यांना विशेष आवड असुन प्रसिद्ध नसले तरी त्यांचे विविध विषयावरचे लेखन, कविता वाचनीय आहेत.ते गायन आणि नृत्य देखिल उत्तम प्रकारे करतात. शालेय जीवनापासून विविध कलागुणांनी त्यांनी आपली छाप नेहमीच पाडलेली होती. पुढे वयाच्या १७ वर्षापासुन राजकारणात एण्ट्री मारून सुरुवात शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासुन त्यांनी केली होती. पुढे ते अल्पावधीत गावचे सर्वात तरुण उपसरपंच झाले. आपल्या गावातील आणि भागातील प्रत्येक सार्वजनिक प्रश्नात हिरिरीने त्यांचा सहभाग नेहमीच राहीलेला आहे. विकासाच्या अनेक योजना राबविण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. शिवसेना- बागल गट- जगताप गट- पाटील गट- शिंदे गट असा विविध गटातटात त्यांनी एक प्रमुख कार्यकर्ता म्हणुन नेहमीच महत्वाची कारकीर्द केली आहे.आजही ते माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचे प्रमुख शिलेदार असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणुन महत्वाची जबाबदारी पार पाडतात. केत्तुरच्या राजकारणात गेली तीस पस्तीस वर्षापासुनचा त्यांचा विशेष सहभाग पाहता ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच पदे त्यांनी भुषविली तर आहेतच परंतु अनेक मित्र मंडळींना देखिल सरपंच पदाच्या खुर्चीत बसविलेले आहे. माजी मंत्री स्व. दिगंबररावजी बागल यांचे सोबत असताना माजी ग्रामविकास मंत्री स्व.आर.आर. आबा पाटील यांनी त्यांची संजय गांधी निराधार योजनेवर अशासकीय सदस्यपदी निवड करून काम करण्याची संधी दिली होती. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी सन-२०१२ साली त्यांना केत्तुर पंचायत समिती गणातुन उमेदवारी दिली होती मात्र अल्पमतांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यांनी ग्रामपंचायतीची सन-२०१७ ची जनतेतुन सरपंच पदाची निवडणुक देखिल ताकदीने लढवली होती. आमदार नारायण आबा पाटील यांचे पार्टीत देखिल त्यांना महत्वाचे स्थान होते मात्र स्थानिक पातळीवरील राजकारणात त्यांना योग्य तो स्पेस न मिळाल्यामुळे त्यांनी सन-२०२२ मधे माजी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला.त्यांचा प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असुन राजकारणात जय पराजय झाला तरी विरोधकांसह सर्वांचे बरोबर नेहमी हसत खेळत वावरतात. राजकारणापायी कोणतीही कटुता मनात न ठेवता गावातील, भागातील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचा असणारा जनसंपर्क खुप मोठा आहे. सर्वांशी सलोख्याने राहण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांचेच आवडीचा विषय असुन, ते माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब, स्व. गोपिनाथराव मुंडे यांना आदर्श मानतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ते चाहते असुन करमाळा तालुक्यातील एक राजकीय अभ्यासक आहेत. गोर गरिबांची कामे,आडलेल्या नडलेल्यांना मदतीचा हात देणे, गावात व परिसरात विविध उपक्रम राबविणे, युवक संघटन करून योग्य मार्गदर्शन करणे, बचत गटांना मार्गदर्शन करणे, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तसेच वयोवृध्दांना मदत करणे, दीन दलित दुबळ्यांना मदत देणे, वृक्षारोपण, रक्तदान यासह अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा कायम सहभाग असतो. वकीली व्यवसायामुळे देखिल त्यांचा गेली वीस वर्षात जनसंपर्क वाढलेला असुन, आज तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांना मानणारा एक विशेष वर्ग तयार झालेला आहे. नेहमी सर्वांचे बरोबर राहुन कोणताही गर्व न करता लहानापासुन वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाशी बोलण्याची व हितगुज करण्याचे त्यांचे शास्त्र वाखाणण्या सारखे आहे. गावातील विविध प्रश्नांसंदर्भात नेहमीच ते जागरुकतेने कार्यरत असतात. केत्तुर नं-१ ते केतुर नं-२, पोमलवाडी ते केत्तुर नं-२ या लोकवर्गणीतून साकारलेल्या पुलाकरीता व त्यानंतर शासनाचा निधी मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षात त्यांचा महत्वाचा रोल राहीलेला आहे. रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने सर्वांनाच परिचित आहेत. गावात स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँक आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देखिल यशस्वी झालेले आहेत. पश्चिम भागातल्याच नाही तर तालुक्यातील प्रत्येक विकासकामां विषयी आणि सर्वसामान्यांच्या कामांकरीता ते अग्रेसर असतात.एखादे काम हातात घेतल्यानंतर स्वतःचे खिशाला कात्री लावुन आर्थिक नियोजन करणे, कागदपत्रांची तयारी करून कामाचे फाइल तयार करणे व निरंतर पाठपुरावा करणे चा त्यांचा स्वभाव सर्वांना नेहमीच त्यांचेतील नेतृत्व गुणाची चमक दाखवतो.अतिशय निडर स्वभावाचे असणाऱ्या ॲड. अजित विघ्ने हे सध्या जलसंपदा विभागासह,स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा परिषद सोलापुर/ पंचायत समिती करमाळा चे पॅनल ॲडव्होकेट म्हणुनही कार्यरत आहेत. स्वतः ते भारत सरकार नोटरी असुन पश्चिम भागातले पहिले नोटरी होण्याचा मान त्यांना लाभलेला आहे. त्यांचे कार्याचा नेहमीच गौरव झालेला असुन, सकाळ वृत्तपत्र समुह, लोकमत यासह पुण्य नगरी यांचे सह विविध संघटनाकडून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. संपादक राजा माने यांचे डिजिटल मिडीया संघटने कडुन देखिल त्यांना गौरविण्यात आलेले असुन, करमाळा तालुक्यातील सर्व राजकीय,सामाजिक मंडळी,व्यापारी,डॉक्टर, इंजिनियर,वकील, उदयोजक यासह पत्रकार, अधिकारी,नोकरदार यांचेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित आहेत. पश्चिम भागात त्यांनी गुलमरवाडी, भगतवाडी,कात्रज, पोमलवाडी,केत्तुर , पारेवाडी, हिंगणी येथील युवकांना बचत गटासाठी व विविध उदयोग धंद्यासाठीचे मार्गदर्शन केलेले असुन नुकतीच त्यांनी अनेक गावातील युवक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन प्रोमाई ग्रीन ॲग्रो शेतकरी बचत गटाची यशस्वी स्थापना केलेली आहे. लवकरच याच माध्यमातुन प्रोमाई ग्रीन ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना होत असुन.. पश्चिम भागातील व करमाळा तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांना शेतीपुरक उदयोग धंदयाचे मार्गदर्शन करून नवनवीन प्रकल्प उभारण्याचा संकल्प केलेला आहे. पश्चिम भागातील डिकसळ ते कोंढार चिंचोली पुलाचे मंजुर काम जलदगतीने होणे करिता त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे मार्फत पाठपुरावा चालु असुन, चांडगाव ते पोमलवाडी या महत्वपूर्ण असणाऱ्या पुलाकरीता मागणी प्रस्ताव तयार करून त्यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. पुणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाडयांचा थांबा मिळविण्या करिता कायम अग्रेसर असुन त्यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री खासदार,आमदार यांचेकडे सततचा पाठपुरावा चालु असतो.कायम लोकसेवे करिता दिवसरात्र झटणारा हा उमदा कार्यकर्ता असुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून केत्तुर पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्याची ईच्छा व्यक्त केलेली असुन त्यांनी या निवडणुकीत उभा रहावे अशी सर्वसामान्य जनतेतुन मागणी देखिल होत आहे.अशा या होतकरू व सर्वसामान्यांसाठी कायम झटणाऱ्या अभ्यासु नेतृत्वाच्या पाठीशी राहण्यासाठी आपण सर्व सज्ज राहु!…

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

7 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

12 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

17 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

23 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago