Categories: करमाळा

करमाळा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेच्या प्रा. दत्तात्रय भागडे यांची चेअरमन पदी तर सुहास गायकवाड यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड…

 

.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष (चेअरमन) व उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदांची निवड प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात लोकशाही पद्धतीने पार पडली. या निवड प्रक्रियेत म. गांधी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे प्रा. दत्तात्रय भागडे यांची चेअरमन पदी तर कणवमुनी विद्यालयाचे सुहास गायकवाड यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.करमाळा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या निवडी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात, निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भेंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. अध्यासी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार झालेल्या या निवड प्रक्रियेत चेअरमन पदासाठी प्रा. भागडे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. गायकवाड यांचे एकमेव अर्ज आले होते. त्यानुसार दोन्हीही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
या प्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन यशवंतराव लावंड, श्री. पठाण, श्री . दिरंगे , सौ. मनिषा तनपुरे–सपकाळ, माजी व्हाईस चेअरमन श्री. बदे सर, लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे सचिव रविंद्र सपकाळ, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, संचालक किरण परदेशी, श्री. आरकिले, सौ. ज्योती चव्हाण, श्रीकांत नलबे, नानासाहेब नीळ, श्री . चव्हाण तसेच सोसायटीचे सचिव पांडुरंग वाघमारे आदीं सह मान्यवर उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या निवडीबद्दल मा. आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत आगामी काळात शिक्षकमित्रांच्या विश्वासास तडा जाऊ न देता पारदर्शक, विकासाभिमुख व सहकार्यपूर्ण कारभार करण्याचा विश्वास व्यक्त केला.
करमाळा तालुका शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या या निवडीमुळे तालुक्यातील शिक्षक व सेवक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन नेतृत्वांकडून संस्थेच्या प्रगतीसाठी सक्षम नियोजन व सभासद हिताच्या दृष्टीने प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago