ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचालित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा (ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा सहावा वर्धापन दिन रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त करमाळा शहरात प्रथमच सुप्रसिद्ध वक्ते मा. प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे “चला संस्कारी पिढी घडवू या… (आई-वडिलांचे महत्त्व समजून घेऊया…)” या विषयावर प्रेरणादायी व मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष प्राध्यापक महेश निकष यांनी दिली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटने NEET, JEE, MHT-CET, AGRI-CET अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन देत शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविणे, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे व्याख्यान विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार असून, आजच्या धकाधकीच्या जीवनात आई-वडिलांचे महत्त्व, संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच सुसंस्कृत व जबाबदार पिढी घडविण्याचा संदेश या व्याख्यानातून देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, गणेश नगर, करमाळा, जि. सोलापूर – ४१३२०३ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश निकत सर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या वतीने नियोजन व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…