Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून महायुतीमधुन भाजपने संधी दिल्यास निवडणूक लढवणार – प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून भाजपने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.
दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेमध्ये आपल्याबद्दल प्रेम व आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व नागरिकांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असल्याचे भाजप नेते व शिक्षणतज्ज्ञ प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीने करमाळा तालुक्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटातून संधी दिल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिखलठाण येथे प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे लोकार्पण व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. महायुतीमध्ये शिवसेना सध्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही भाऊ एकत्र आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कुणाला कुठल्या जागा दिल्या जातात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असुन ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांनी महायुती म्हणून म्हणून एकत्र काम करावे लागणार आहे त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी एक निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.
या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ बापू झोळ, माजी संचालक शहाजीराव देशमुख सर, सरडे भाऊसाहेब, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ मंगवडे, हरिभाऊ झिंजाडे, शेलगावचे माजी सरपंच रायचंद दादा खाडे, कुगावचे दत्तात्रय कामटे, वाशिंबे गावचे माजी सरपंच अनुरथ दादा झोळ, पांडुरंग झोळ, तुकाराम खाटमोडे, चांगदेव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपस्थित नागरिकांना दिनदर्शिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास पत्रकार बांधवांसह चिखलठाण व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago