.
निवडीनंतर अध्यक्ष शामल खाटमोडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या खेळ व शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी प्लेवर ब्लॉक्स बसविण्यासाठी ७५ हजार रुपये, तर उपाध्यक्ष पूजा ढवळे यांनी ३१ हजार रुपये अशी भरघोस आर्थिक मदत शाळेस दिली. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास चालना मिळणार आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निशा नवले, चैत्राली जरांडे, माया धुमाळ, मदीना शेख, रूपाली महामुनी, सुहास जाधव, योगेश कनिचे, महेश येवले, योगेश देवकते, संदीप बाबर, नारायण ननवरे तसेच सचिन निंभोरे (शिक्षणतज्ज्ञ) यांची निवड करण्यात आली. याशिवाय कमल पवार (ग्रामपंचायत सदस्य) यांचीही समितीवर निवड झाली.
शाळेच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकी ५ हजार रुपये योगदान दिले. तसेच ग्रामपंचायत सदस्या कमल पवार यांनी १५ हजार रुपये आर्थिक मदत दिली. यामधून एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा शाळा विकास निधी जमा झाला असून हा निधी शाळेच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी वापरण्यात येणार आहे.
निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान सचिव तथा मुख्याध्यापक वनिता पानसरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी समितीच्या सहकार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमावेळी उपस्थित पालकांनी शाळेतील स्वच्छता, भौतिक सुविधा, शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास येडे सर, शितोळे सर, निकत सर, निकम मॅडम यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.
ही निवड व मिळालेला विकास निधी जि. प. प्राथमिक शाळा केत्तूर-२ च्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…