Categories: करमाळा

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे योगदान महत्त्वाचे – ॲड अजित विघ्ने प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध गटांकडून आढावा बैठका, संपर्क दौरे सुरू आहेत. या अनुषंगाने माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना करमाळा तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तालुक्यात विविध विकासकामे प्रत्यक्षात दिसून येत असून नागरिकांमध्ये त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील इतर साखर कारखाने सुरू असताना आदिनाथ व मकाई हे सहकारी साखर कारखाने बंद असल्याने शेतकरी सभासद व कामगार अडचणीत आले आहेत. या गंभीर विषयावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून, जनतेला आता केवळ आरोपांपेक्षा प्रत्यक्ष निकाल अपेक्षित आहेत.
करमाळा तालुक्यातील राजकारणात अलीकडील नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची ठरली असून, विविध गटांच्या नव्या समीकरणांमुळे भविष्यातील राजकीय दिशा बदलताना दिसत आहे. सावंत गटाची नगरपरिषदेत झालेली एण्ट्री ही तालुक्यातील राजकारणात नव्या नेतृत्वाची सुरुवात असल्याचेही चित्र आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व संजयमामा शिंदे गट सज्ज असून, अनेक नवीन कार्यकर्ते व नेते पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती ॲड. विघ्ने यांनी दिली. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून विकासाचा ठोस आराखडा मांडण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago