Categories: करमाळा

प्रा डॉ महेश निकत सर यांना सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 जाहिर*

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या अनाथ सेवक समाज कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान “महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार ” अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा डॉ महेश निकत सर यांना या पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा “महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार” 2026 हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . प्रा डॉ निकत सर यांनी करमाळा सारख्या शिक्षणापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शिक्षण , सामाजिक तसेच झाडे लावा झाडे जगवा , अपघात ग्रस्त लोकांना मदत करणे अश्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अनाथ सेकक समाज कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून निवड पत्राद्वारे देण्यात आली. हा पुरस्कार साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग शिखर गाठलेल्या, पैशाला महत्त्व आलेल्या जगात जनसेवेचे व्रत घेतलेल्या व त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व सेवेसाठी आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या सन्मान मूर्तीना विविध क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उदात्त हेतूने निस्वार्थीपणे कार्य करणारी माणसे, दखल घेतल्या न गेलेल्या अव्याहतपणे राबणाऱ्या अदृश्य हातांना सन्मानित करून पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम पुरस्काराच्या निमित्ताने युवा ही संस्था करणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

7 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

7 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago