Categories: करमाळा

करमाळा तालुकास्तरीय किशोरी मेळावा आमदार नारायण आबा पाटील यांचे उपस्थितीत संपन्न

*करमाळा प्रतिनिधी 03 जानेवारी पंचायत समिती करमाळा शिक्षण विभाग यांचे वतीने तालुकास्तरीय किशोरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा माढा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील तसेच आदिनाथ कारखाना संचालक देवानंद बागल करमाळा पंचायत समिती माजी सभापती अतुल भाऊ पाटील व गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम एपीआय गिरीजा मस्के ऍड. सविता शिंदे निर्भया पथक इंगोले मॅडम श्री पवार हे उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी नितीन कदम यांचे मार्गदर्शनाखाली श्री मिनीनाथ टकले, जयवंत नलावडे विस्ताराधिकारी यांनी सदर किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार नारायण आबा पाटील व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले श्रीमती गुंजाळ मॅडम यांनी बालिका प्रतिज्ञा वाचन करून श्रीमती रोहिणी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना योगा बाबत मार्गदर्शन केले. ऍड.सविता शिंदे यांनी मुलींना कायद्याबाबतचे मार्गदर्शन केले एपीआय मस्के यांनी मुलींना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी नितीन कदम यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमा वेळी विविध गुणदर्शन स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्नमंजुषा या स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना अतुल भाऊ पाटील माजी सभापती करमाळा व डॉ. अमित कदम गटविकास अधिकारी करमाळा यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार नारायण आबा पाटील यांनी विद्यार्थिनींना सर्व स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी अथक परिश्रम घेण्याबाबत व उच्च पदावर स्पर्धा परीक्षेद्वारे यश संपादन करणे बाबत आव्हान केले तसेच शैक्षणिक कार्यामध्ये मदत करण्याचे आश्वासन केले. किशोरी मेळावा उत्कृष्टपणे आयोजन केल्याबद्दल शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. करमाळा तालुकास्तरीय किशोरी मेळाव्यामध्ये सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक विषय शिक्षक विशेष शिक्षक बी आर सी सदस्य यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले. विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले यांनी आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago