निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना प्रशांत ढाळे म्हणाले की आमचें नेते मा.आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण अधिक जोमाने काम करणार आहोत. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज व्यवस्था यांसह सर्व मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. तसेच नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवून प्रशासन व जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांच्या वतीने नूतन नगरसेवकपदी तसेच शिवसेना गटनेता म्हणून निवड झाल्याबद्दल प्रशांत ढाळे यांचा शाल, श्रीफळ व हार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ढाळे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सत्कार समारंभास ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमचंद आब्बड, रवींद्र नाईक, गिरीश शहा, पत्रकार दिनेश मडके, सोमनाथ बागडे, संतोष वायकर, सौ. मनिषा नाईक, सौ. वैशाली बागडे, सौ. छाया शहा श्रध्दा शहा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रशांत ढाळे यांच्या निवडीचे स्वागत करत प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नागरिकांच्या सहभागातून विकासकामांना गती देत प्रभाग क्रमांक सहा आदर्श प्रभाग म्हणून विकसित केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…