Categories: करमाळा

करमाळा तालुका सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी मनोहरशेठ आरुण बुराडे यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधीः

सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करमाळा तालुका अध्यक्षपदी मा. मनोहरशेठ आरुण बुराडे (ता. करमाळा, जि. सोलापूर) यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. उमेशशेठ सुरेशराव बुऱ्हाडे यांच्या व मार्गदर्शक मा. काकासाहेब बुहाडे यांच्या आदेशानुसार देण्यात आले आहे.भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. काकासाहेब बुहाडे यांनी “सराफ व सुवर्णकार यांच्या न्याय व हक्कांचे संरक्षण करणे” हा स्पष्ट संकल्प दिला असून, त्याच ध्येयधोरणानुसार सराफ सुवर्णकार संरक्षण समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून सराफ, सुवर्णकार तसेच संलग्न व्यवसायिकांच्या समस्या शासनदरबारी मांडणे, त्यांना न्याय मिळवून देणे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

मनोहरशेठ आरुण बुटराडे हे सामाजिक, व्यावसायिक आणि संघटनात्मक क्षेत्रात कार्यरत असलेले अनुभवी व विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा तपशील, संघटन कौशल्य व सराफ सुवर्णकार समाजातील योगदान पाहता त्यांचीकरमाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील सराफ सुवर्णकार संरक्षण समिती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या नियुक्तीमुळे करमाळा तालुक्यातील सराफ सुवर्णकार बांधवांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व संघटन प्रतिनिधींनी मनोहरशेठ आरुण बुराडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.करमाळा तालुक्यातील सराफ सुवर्णकार समाजाच्या न्याय, हक्क आणि सुरक्षिततेसाठी मनोहरशेठ आरुण बुराडे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच प्रभावी कार्य होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

यावेळी राधेशाम देवी, रवि सोनी सुशील कटारिया, विवेक सोनी, प्रशांत ढाले, नंदकिशोर काटकर, दत्तात्रय काटकर, अमित सोळंकी, अभिजित वाशिंबेकर, राजुकाका वाशिंबेकर, मुथा महावीर, संदीप बोकन, शेखर वाशिंबेकर, अभिजित दोशी, अतुल बोकन, तेजस बोकन व करमाळा शहरातील

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago