Categories: करमाळा

करमाळ्याची लेक तृप्ती ताई साखरे, गाजवतेय पुणे जिल्हा परिषदचे रणांगण.

 

करमाळा प्रतिनिधी राज्यात सर्वत्र लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक जाहीर होणार असल्याची चर्चा आहे.इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराची, गावभेट दौऱ्याची रणधुमाळी जोरात सुरू असलेली social media च्या माध्यमातून मतदार राजा पाहत आहे. याच फेसबुक, इंस्टाग्राम,यूट्यूब व्हाट्सअप या मीडियाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या रणांगणात आपल नशीब आजमावत असलेल आणि गाजत असलेल नाव म्हणजे सौ. तृप्तीताई साखरे-सरोदे.
करमाळा तालुक्यातील राजुरी गाव माहेर असणाऱ्या तृप्ती ताई साखरे-सरोदे ह्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष होत्या. करमाळा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरण पोचवण्याचं काम त्यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आपण पाहिलं होतं.कोरोना काळाममध्ये सर्वसामान्य नागरिकांना केलेले धान्य वाटप, शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर उठवलेला आवाज, महिलांच्या प्रश्नांवरती वेळोवेळी केलेली आंदोलने ही करमाळा तालुक्यातील चर्चेचा विषय ठरत होती. आपल्या कामाच्या जोरावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदावर काम करणाऱ्या राजुरी येथील सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या तृप्ती ताई साखरे-सरोदे या आज पुणे जिल्हा परिषद गटाच्या शिरूर ग्रामीण न्हावरा जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सर्वसामान्य लोकांचा मिळालेला प्रतिसाद करमाळा तालुक्यात देखील चर्चेचा विषय होत आहे. माहेरी समाजकारण आणि राजकारण या दोन्हींचा वारसा असला तर सासरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त सर्वसामान्य लोकांशी जोडलेली नाळ, उत्कृष्ट संघटन कौशल्य,चांगले नेतृत्वगुण, जनसामान्यांमध्ये असणारी स्वच्छ प्रतिमा,शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी सोडवण्याची हातोटी, प्रशासनावर असणारी पकड अशा एक ना अनेक गोष्टींमुळे तृप्ती ताईंनी अल्पावधीत शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर आपलं नाव पुढे आणलेलं आहे आणि म्हणूनच आज प्रत्येक सर्वसामान्य घरामध्ये त्यांना मिळालेला उदंड उस्फुर्त प्रतिसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आणि म्हणूनच करमाळ्याची ही लेक लवकरच पुणे जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून निवडून यावी अशा सदिच्छा संपूर्ण करमाळावासिय व्यक्त करत आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago