Categories: करमाळा

करमाळ्याच्या नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

*
करमाळा प्रतिनिधी :
करमाळा शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक व प्रशासनाच्या सहकार्याने शहर स्वच्छ, सुंदर व सुव्यवस्थित करण्यासोबतच सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार करमाळ्याच्या नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांनी व्यक्त केला.
करमाळा नगरपालिकेचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना सौ. सावंत म्हणाल्या की, करमाळा शहरातील जनतेने मला व करमाळा शहर विकास आघाडीला भरभरून मते देऊन निवडून दिले असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे व पारदर्शक कारभारातून विकासकामांना गती दिली जाईल.
या प्रसंगी मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व त्यांचे पती संजय भगवान सावंत यांचा नगरपालिकेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात करमाळा शहर विकास आघाडीचे नगरसेवक रवी जाधव, विक्रमसिंह परदेशी, सौ चैताली सुनील सावंत सौ. ज्योत्स्ना लुणिया, सौ. जबीन मुलाणी, सौ.पुजा इंदलकर , संदिप कांबळे व संजय सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कक्षामध्ये कै. सुभाष आण्णा सावंत व कै. डी. के. सावंत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी सांगितले की, करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवली. प्रस्थापित व मोठ्या पक्षांबरोबर थेट लढत असतानाही जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करून निश्चितच सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांचे पती संजय भगवान सावंत यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, जनतेने दिलेली भरभरून मते ही विकासासाठीच दिली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, नालेसफाई यासह करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एकत्रितपणे काम केले जाईल.
आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना नूतन नगराध्यक्षा व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. आता खऱ्या अर्थाने नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने मतांच्या माध्यमातून टाकलेला विश्वास निश्चितच नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत व सर्व नगरसेवक पूर्ण करतील आणि करमाळा शहराचा चेहरामोहरा बदलून शहर स्वच्छ व सुंदर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करमाळा शहरातून दोस्ती बँडच्या नादात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.करमाळा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळयांना पुष्पहार घालून पद यात्रा काढुन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपालिकेत जाऊन अधिकृतपणे पदग्रहण केले. करमाळा नगरपालिकेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या करमाळा शहर विकास आघाडीच्या नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
शुक्रवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सौ. मोहिनी संजय सावंत यांनी करमाळा नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये भाजपचे नगरसेवक दिपक चव्हाण, सचिन घोलप, अतुल फंड,सौ. स्वाती महादेव फंड, नगरसेवक प्रतिनिधी विजय घोलप,सचिन गायकवाड, रामभाऊ ढाणे यांनी नूतन नगराध्यक्ष सौ मोहिनी संजय सावंत व त्यांचे पती संजय सावंत यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, अजितसिंह परदेशी, झनकसिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रवीण कटारिया, सुखदेव लष्कर, लालाभाई कुरेशी,गणेश झोळे, मनोज गोडसे, शैलेश खडके, सुनील लुणिया, पिल्लू इंदलकर, अभय महाजन, कदीर शेख, महेश मोरे, विनोद महानवर, प्रियंका गायकवाड, जयश्रीताई मुसळे, मीरा शेंडे, पुष्पा शिंदे, अल्लाउद्दीन शेख, बापू उबाळे, पांडुरंग घोगरे, पप्पू सूर्यवंशी, भूषण खुळे, अमोल परदेशी, हुमरान मुलाणी, जितेश कांबळे, बापू मोरे, देवा लोंढे, रविंद्र कांबळे, जमीर सय्यद, सुनिल विटकर, राजकुमार जगताप, बाळासाहेब कुंभार, सावंत बंधू व त्यांचे कुटुंबीय, करमाळा शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच सावंत गटावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

3 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

9 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

15 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago