Categories: करमाळा

करमाळ्यात ११ वा आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सव १० जानेवारीला

करमाळा प्रतिनिधी :
येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त ११ वा आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सव शुक्रवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय, करमाळा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली. हा महोत्सव सर्व रसिकांसाठी मोफत असणार आहे.
या महोत्सवात पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश, गुवाहाटी आदी विविध राज्यांतील नामवंत कलाकार सहभागी होणार असून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत तसेच नृत्यकलेचे बहारदार सादरीकरण होणार आहे. विविध प्रांतातील कला परंपरांचा संगम अनुभवण्याची दुर्मिळ संधी करमाळा व तालुक्यातील रसिकांना मिळणार आहे.
महोत्सवात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, संतूर व तबला वादनासह कथक, भरतनाट्यम, ओडिसी, सत्रिया, रवींद्र नृत्य व कठपुतली अशा विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच सुरताल संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन-वादन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
यावेळी कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये
डॉ. मोनिषा देवी गोस्वामी (गुवाहाटी) – सुरताल नृत्य साधना पुरस्कार,
गुरु इतिश्री पटनायक (पुरी) – सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार,
गुरु श्रुती पंडित (पुणे) – सुरताल नृत्य भूषण पुरस्कार,
गुरु सुचरिता घोष (हैदराबाद) – सुरताल नृत्य कलाश्री पुरस्कार,
कु. दिपनका शर्मा (इंदौर) – सुरताल नृत्य गौरव पुरस्कार,
कु. अभिप्सा नंदी (कोलकाता) – सुरताल कलानिधी पुरस्कार,
प्रकाश शिंदे (पुणे) – सुरताल वाद्य साधना पुरस्कार,
कु. गितिमा दास (गुवाहाटी) – सुरताल कला गौरव पुरस्कार,
तसेच डॉ. विथीका टिकू (जम्मू-काश्मीर) – सुरताल कला भूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तसेच करमाळा तालुक्यात कला, शिक्षण, योग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. राधिका तांबे घोलप यांना आंतरराष्ट्रीय योगाचार्य पुरस्कार, प्राचार्य मिलिंद फंड यांना सुरताल संगीत रसिक पुरस्कार, चित्रकार निवास कन्हेरे यांना सुरताल कला गौरव पुरस्कार, कल्याणराव साळुंखे सर यांना सुरताल संगीत रसिक पुरस्कार तर संतोष ऊर्फ राजू जीवनलाल शियाळ यांना आदर्श व्यापारी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा कलाकार सन्मान यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्यावतीनेही करण्यात येणार आहे.
हा महोत्सव करमाळा परिसरातील कला रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

14 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

2 days ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago