Categories: करमाळा

सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सराफ-सुवर्णकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी – मनोहर बुराडे

करमाळा (प्रतिनिधी) :
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ही संस्था सुवर्ण चळवळ, व्यावसायिक न्यायहक्कांचे संरक्षण तसेच सराफ-सुवर्णकार बांधवांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्यासाठी कार्यरत असल्याचे मत संस्थेचे नूतन करमाळा तालुकाध्यक्ष मनोहर बुराडे यांनी व्यक्त केले.
ते कोर्टी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी करमाळा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील बागायतदार अनिल शिंदे हे होते.
पुढे बोलताना बुराडे म्हणाले की, संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गाव, शहर, तालुका व जिल्हा पातळीवर पदाधिकारी नेमून संघटना अधिक मजबूत करणे आणि सराफ-सुवर्णकार बांधवांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देणे हे आहे. संस्थेच्या माध्यमातून सराफ, सुवर्णकार व संबंधित व्यावसायिकांना कायदेशीर, सामाजिक व संघटनात्मक पातळीवर योग्य मार्गदर्शन व मदत दिली जाणार आहे. यामध्ये व्यवसायाशी संबंधित अडचणी, तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे तसेच संघटनात्मक मुद्द्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्व बांधवांनी संस्थेशी संलग्न व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मनोहर बुराडे यांची निवड प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ बुराडे तसेच प्रदेश सचिव गणेश बनछोड यांनी पत्राद्वारे केल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी कोर्टा ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, शहाजी धुमाळ, प्रल्हाद वायदंडे, सोमनाथ हुलगे, शहाजी हुलगे, मोहन शिरस्कर, किरण मेहर, मनोज धुमाळ, चंद्रकांत कुटे, नवनाथ आबा दुरंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

6 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

9 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

10 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

10 hours ago