Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची बांधकामे प्रगतीपथावर डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात ४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील महसूल विभागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी (सर्कल) कार्यालयांच्या बांधकामांना गती मिळाली असून, सध्या ही सर्व बांधकामे विविध ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी तत्कालीन आमदार मा. संजयमामा शिंदे यांनी डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालये अस्तित्वात असली, तरी स्वतंत्र तलाठी कार्यालयांचा अभाव आहे. काही ठिकाणी असलेली कार्यालये मोडकळीस आलेली असून, अनेक ठिकाणी तलाठी कार्यालये ग्रामपंचायतींच्या इमारतीतच चालविली जात आहेत. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांच्या स्वतंत्र इमारती उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
या अंतर्गत प्रत्येकी १५ लाख रुपये निधीप्रमाणे एकूण २८ इमारतींच्या बांधकामासाठी ४ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध गावांमध्ये कामे सुरू आहेत.
या गावांमध्ये मंडळ अधिकारी कार्यालयांची बांधकामे सुरू
करमाळा, जेऊर, केम, सालसे, अर्जुननगर, कोर्टी, केतुर व उमरड.
या गावांमध्ये तलाठी कार्यालयांची बांधकामे सुरू
देवळाली, जातेगाव, वांगी, निंभोरे, गुळसडी, कंदर, घोटी, पांगरे, आवाटी, साडे, कोळगाव, करंजे, रावगाव, वीट, जिंती, हिंगणी, कात्रज, चिखलठाण, वाशिंबे व शेटफळ.
या बांधकामांमुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होणार असून, नागरिकांची कामे वेळेत व सुलभरीत्या पार पडण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

9 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

12 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago