Categories: करमाळा

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर सौ माधुरी राजेंद्र परदेशी व ॲड. प्रा.श्री शशिकांत नरुटे यांची निवड*

करमाळा प्रतिनिधी 
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पुरवठा शाखा तर्फे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठित करण्यात आली. या समितीत जिल्हा ग्राहक संरक्षण प्रतिनिधीअशासकीय सदयस म्हणून ऐकून 19 जणांची निवड करण्यात आली. त्या मध्ये करमाळा तालुका तील सौ.माधुरी राजेंद्र परदेशी व श्री एडवोकेट प्राध्यापक शशिकांत नरुटे यांची माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली *अशासकीय सदस्य* म्हणून नियुक्त करण्यात आले. यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या परिषदेंतर्गत एकूण 42 सदस्य नियुक्त करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे प्रतिनिधी, महानगरपालिका प्रतिनिधी, पंचायत समिती प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी,ग्राहक संघटना प्रतिनिधी, शाळा महाविद्यालय प्रतिनिधी, वैद्यकीय व्यावसायिक संस्था प्रतिनिधी, व्यापारी व उद्योग संघ प्रतिनिधी,तसेच पेट्रोल गॅस विक्रेते व शेतकरी प्रतिनिधी चा समावेश आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम (भा. प्र. से )यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला आहे. या समितीमध्ये असणारे अशासकीय सदस्य तीन वर्ष किंवा नवीन सदस्य नेमले जात नाही तोपर्यंत कार्यरत राहतील. या निवडी बद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष श्री बाळासाहेब औटी व प्रांत सहसचिव श्री दीपक इरकल व सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री शशिकांत हरिदास यांनी अभिनंदन केले. करमाळा तालुका अद्यक्ष व सगळ्या सद्यसनी अभिनंदन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago