Categories: Uncategorized

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवणार – दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी 
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवण्यात येणार असून, विकासकामांच्या जोरावर करमाळा तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार आहे, असे प्रतिपादन भाजप नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.
करमाळा येथील बागल निवासस्थानी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित विचारविनिमय मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते.
बागल म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांनी स्वबळावर ठेवावी. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व ताकदीने पार पाडणे आवश्यक आहे. युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय योग्य वेळी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र तोपर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमास व्यासपीठावर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, उपनगराध्यक्ष अतुल फंड, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मकाईचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, साहेबराव रोकडे भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ आदिनाथ चे माजी संचालक दत्तात्रय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी विजय रोकडे, शुभम बंडगर, लक्ष्मण केकान, भाऊसाहेब गव्हाणे, गणेश भोरे, यशपाल कांबळे, कल्याण सरडे, रमेश कांबळे, देवकर गुरूजी यांनी आपली मते मांडत पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनुसारच करमाळा तालुक्यातील राजकीय वाटचाल सुरू राहील. सर्वसामान्यांचे हित व पक्षवाढीसाठी प्रसंगी माघार घेण्याची तयारी आहे; मात्र चुकीच्या गोष्टींवर कठोर भूमिका घेतली जाईल.तसेच विलासराव घुमरे यांनी करमाळा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगून, गटतट व मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने विकासकामांच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुभाष पवार सूत्रसंचालन नितीन चोपडे व रणजित शिंदे यांनी केले, तर आभार विजय लावंड यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago