Categories: करमाळा

शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी १९ जानेवारी रोजी करमाळ्यात विचारविनिमय बैठक

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवप्रेमी नागरिकांसाठी विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिनांक १९ जानेवारी २०२६, वार सोमवार रोजी सायंकाळी ७ वाजता दत्त मंदिर कॉटेजजवळ, करमाळा येथे होणार आहे.
शिवजयंती उत्सव हा सामाजिक एकतेचे, राष्ट्रीय विचारांचे आणि शिवचरित्राच्या प्रेरणेचे प्रतीक असून हा उत्सव अधिक व्यापक, शिस्तबद्ध व उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवजयंती निमित्त मिरवणूक मार्ग, कार्यक्रमांचे नियोजन, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, सजावट, स्वयंसेवकांची जबाबदारी, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासनाशी समन्वय यासारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
करमाळा शहरासह तालुक्यातील सर्व शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे, महिला मंडळे तसेच सर्व शिवप्रेमींनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडावेत, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वांच्या सहकार्याने यावर्षीचा शिवजयंती उत्सव अधिक भव्य, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक करण्याचा समितीचा मानस आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago