Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी; ३४२ अर्जांची विक्री

‌ करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३४२ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली.
तालुक्यातील विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंचायत समिती कार्यालयात दिवसभर उमेदवारी अर्ज घेणे व दाखल करण्यासाठी गर्दी होत असून ही प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आणखी गती येण्याची शक्यता असून त्यानंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे १२ गण आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण २ लाख ८ हजार २३ मतदार असून त्यामध्ये १ लाख ९ हजार २१३ पुरुष, ९८ हजार ८०९ महिला व एक इतर मतदाराचा समावेश आहे. मोठ्या मतदारसंख्येमुळे आणि वाढलेल्या उमेदवारांच्या संख्येमुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago