करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा दहिगाव उपसा सिंचन योजना पाहणी दौरा..

करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदार संघाचे आ. संजयमामा शिंदे यांची काम करण्याची पद्धत निश्चितच वेगळी आहे. कोणताही प्रश्न ते अगोदर मुळापासून समजून घेतात आणि त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व ताकद पणाला लावतात. हे त्यांच्या आजवरच्या कामातून दिसून आले आहे.
आमदार बनल्यानंतर लोकांचे हारतुरे ,सत्कार स्वीकारणे व त्यांना भलीमोठी आश्वासने देणे यात वेळ दवडण्यापेक्षा आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी कॅनलचा दोन दिवसाचा पाहणी अभ्यास दौरा केला .जवळपास दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीवरून करमाळा तालुक्याला येणारे पाणी , त्यात येणाऱ्या अडचणी , पाण्याची गळती , पाणी चोरी ,पाण्याचा वेग इत्यादी सर्व समजून घेऊन त्यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी केली. आणि त्यानुसार कुकडी ची तीन आवर्तने करमाळा तालुक्यासाठी अनुक्रमे जानेवारी , मार्च , आणि जून या महिन्यात सोडली .याच पद्धतीने दहिगाव उपसा सिंचन योजनेची दोन आवर्तने त्यांनी अनुक्रमे जानेवारी आणि मे या महिन्यात सोडली.
दहिगाव उपसा सिंचन योजना ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे या योजनेला अनेक मर्यादा पडतात .याचा परिणाम आवर्तनावरती होतो हे लक्षात आल्यामुळे आ. संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यापूर्वी त्याचा उद्या पाहणी दौरा करण्याचे निश्चित केले आहे. सकाळी 10 ते 01 या वेळेत दहीगाव व कुंभेज येथील पंपगृह व परिसर याची पाहणी करणे , वितरणकुंड क्र. 1 व क्र. 2 यांची पाहणी करणे , तसेच खडकेवाडी ते घोटी या मुख्य कॅनॉलवरच्या अडचणी , शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेणे असे त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत गोदावरी महामंडळांतर्गत मराठवाड्याला पाणी देण्यासाठी उजनी ते कोळगाव धरण यादरम्यान करमाळा तालुक्यात बोगद्याचे काम सुरू आहे. जेऊर, सरपडोह ,सौंदे , शेलगाव ,अर्जुननगर याठिकाणी या बोगद्याच्या शाफ्ट आहेत . या शाफ्टला भेटी देऊन त्यांच्या अडचणीही आ. संजयमामा शिंदे समजून घेणार आहेत .याप्रसंगी कृष्णा खोरे महामंडळाचे व गोदावरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.


saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 hour ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

18 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago