गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने यंदाच्या वर्षी गणेश जयंती उत्सव गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी करमाळा शहरातील वेताळपेठ येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष नगरसेवक प्रशांत ढाळे यांनी दिली.
गणेश जयंतीनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून होम-हवन व सहस्त्र आवर्तन गणेश याग संपन्न होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून करमाळा शहर व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असून या उत्सवात सर्व जाती-धर्मांचे नागरिक सहभागी होत सामाजिक सलोखा व एकतेचा संदेश दिला जातो. शहरातील नागरिक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा करतात, हे या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य असल्याचे प्रशांत ढाळे यांनी सांगितले.
करमाळा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गणेश जयंती उत्सव व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…