कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू देऊन करण्यात आली. त्यानंतर महिलांसाठी उखाणे घेणे, संगीत खुर्ची खेळ अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विशेषतः उखाण्यांच्या कार्यक्रमात महिलांनी आपली कला, विनोदबुद्धी व संस्कृतीचे दर्शन घडवले, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात आनंदी वातावरण निर्माण झाले.
खेळांमध्ये सहभाग घेणाऱ्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षिका राऊत मॅडम यांनी उपस्थित महिलांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व तर खुळे मॅडम यांनी महिलांचे आरोग्य व स्वच्छता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आपुलकी, स्नेह व एकोप्याची भावना वाढीस लागली. तसेच पारंपरिक सणांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशही साध्य झाला.
या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व महिला व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम कुलकर्णी मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री गभाले सरांनी केले.
उत्कृष्ट फलक लेखन श्रीम शिंदे मॅडम तर उत्कृष्ट रांगोळी रेखाटन श्रीम निंबाळकर मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री शशिकांत क्षीरसागर सरांनी विशेष परिश्रम घेतले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…