Categories: करमाळा

करमाळा जिल्हापरिषद वीट गटामधुन भव्य शक्ती प्रदर्शन करत महायुती भाजपच्या सौ अश्विनी गणेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


करमाळा प्रतिनिधी 
करमाळा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या पत्नी सौ. अश्विनी गणेश चिवटे यांनी वीट जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त करमाळा शहरात भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांच्या पुतळयांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हलगीच्या नादात, मोठ्या मिरवणुकीद्वारे संपूर्ण करमाळा शहरातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या मिरवणुकीत करमाळा तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, शेतकरी व नागरिक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी दिदी बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते कन्हैयालाल देवी  उपनगराध्यक्ष अतुल फंड तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे रामा ढाणे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे  जगदिश आगरवाल महादेव गोसावी उपस्थित होते. करमाळा तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली असून महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या वतीने सौ. अश्विनी गणेश चिवटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संपूर्ण करमाळा शहरातून सर्वांना अभिवादन करत गणेश भाऊ चिवटे यांनी आपल्या धर्मपत्नीचा उमेदवारी अर्ज भव्य शक्तीप्रदर्शनात दाखल केला. यावेळी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रतिक्रिया देताना गणेश भाऊ चिवटे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष त्यांना संधी देतो. भविष्यातही भाजप कार्यकर्त्यांना संधी देत राहील. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती झाल्याने सर्व कार्यकर्त्यांनी महायुती धर्म पाळून एकजुटीने काम करावे व निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र दिसून येत आहे

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago