Categories: करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था स्माईल दातांचा दवाखाना डेंटल केअर यांच्या संयुक्त विद्यमाने २५जानेवारीला करमाळा येथे दातांच्या कवळीचे सवलतीच्या दरात विशेष शिबीर

.         करमाळा प्रतिनिधी
डॉ. प्रदीपकुमार (आबा) पाटील यांच्या स्मरणार्थ आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या विद्यमाने स्माईल दातांचा दवाखाना डेंटल केअर, करमाळा यांच्या सहकार्याने दातांच्या कवळी बसविण्याचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर रविवार, दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, शिबीराचे स्थळ जाधव–पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा असे आहे.
या शिबिरामध्ये दातांच्या कवळी बसविण्याची सुविधा ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दातांच्या कवळीची मूळ किंमत २५,००० रुपये असून शिबिराच्या निमित्ताने ही सुविधा केवळ १२,५०० रुपयांत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार दंतोपचार अल्प दरात मिळणार आहेत.
शिबिरामध्ये अनुभवी व तज्ञ दंतचिकित्सक सेवा देणार असून यामध्ये डॉ. अशमान सिंह (B.D.S.), डॉ. प्रविण गायकवाड (M.D.S.) आणि डॉ. सचिन महाबोले (B.D.S.) यांचा समावेश आहे. दातांची तपासणी, योग्य सल्ला व आवश्यक उपचार या शिबिरात करण्यात येणार आहेत.
दातांची कवळी बसवून निरोगी व आत्मविश्वासपूर्ण जीवन जगावे, या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी मो. ९९२१७४१५१२ / ७५५९२१४५५१, तसेच फोन (०२१८२) २९९६११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या नियोजनासाठी शितल सर (मो. ७५५९२१४५५१)  अभिजीत पाटील (मो. ९४२३६३७३२८) यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमाचा लाभ करमाळा व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago