Categories: करमाळा

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न…


करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे स्नेहसंमेलन अविष्कार 25-2026 उत्साही वातावरणात संपन्न झाले आहे. करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाडी-वस्ती वरील सामान्य कुटुंबातील चिमुकले कलाकारांनी देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीते यावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनिताई सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी, स्नेहालय स्कूलचे संचालक रामचंद्र दळवी, द्रौपती वाघमारे, सुमन दळवी, सुलोचना दळवी, प्रियांका गायकवाड उपस्थित होते.
यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मँडम यांनी प्रास्ताविक केले तर नगराध्यक्षा मोहिनिताई सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्कूलच्या सहशिक्षिका शिवांगी कांबळे, अश्विनी पाटील, रोहीणी गरड, सुनंदा दुधे, आशा पाटणे, पूजा पाटील, आश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, आसिफ मणेरी सर्व टिचर्स कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे पालक वर्ग श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago