लोकमंगल पतसंस्थेच्या करमाळा शाखेत मकर संक्रांतनिमित्त आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात करमाळा नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
याप्रसंगी शाखेच्या सल्लागार डॉ. सौ. सुनीता दोशी यांनी लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल समूहाच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती उपस्थित महिलांना दिली. पतसंस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपस्थित महिला खातेदारांना पतसंस्थेचा अहवाल, कॅलेंडर, माहितीपत्रक तसेच वाण देण्यात आले. तसेच शाखेच्या महिला कर्मचारी सौ. आरती पतंगे यांनी लोकमंगल पतसंस्थेच्या विविध बचत व कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास करमाळा शहरातील महिला खातेदारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संक्रांतीच्या सणानिमित्त पारंपरिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाखाधिकारी तसेच शाखेतील महिला कर्मचारी सौ. सुलभा काळे, कु. सलोनी शिंदे आणि महेश अनारसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…