Categories: करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) च्या अंतर्गत आयोजित विशेष श्रमदान शिबिर उत्साहात व यशस्वीपणे चालू

करमाळा प्रतिनिधी:
राजेगाव ता. दौंड जि. पुणे येथे दत्तकला शिक्षण संस्थेमार्फत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अंतर्गत श्रमदान शिबिर दिनांक २० जानेवारी २०२६ पासून यशस्वीरित्या चालू आहे. आज शिबिराचा चौथा दिवस होता. या शिबिरास राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे विभागीय सन्मवयक डॉ. अनिल बनसोडे सर यांनी सदिच्छ भेट देत स्वयंसेवकांचे मनोबल वाढवले, तर सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. मीना कुलकर्णी यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान दिले.
या विशेष श्रमदान शिबिरात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
यावेळी डॉ. अनिल बनसोडे सरांनी युवकांनी समाजसेवेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, सचिवा प्रा. मायाताई झोळ मॅडम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर यांच्या मार्गदर्शना अंतर्गत NSS कार्यक्रम अधिकारी, शिक्षकवृंद तसेच सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सेवाभाव आणि महिलांविषयी सन्मान व समानतेची जाणीव अधिक दृढ होत आहे. तसेच हा उपक्रम २६ जानेवारी २०२६ पर्यंत चालू राहणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago