प्रधानमंत्री आवास व स्वनिधी योजनांसाठी ३० जानेवारी रोजी करमाळ्यात विशेष नोंदणी मेळावा


करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (स्वनिधी योजना) अंतर्गत पात्र व इच्छुक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली. या मेळाव्यात शासनाच्या इतर विविध लोककल्याणकारी योजनांचीही माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
हा मेळावा शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील ज्ञानेश्वर वाचन मंदिर, किल्ला विभाग येथे होणार आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे तसेच पथविक्रेत्यांसाठी हा मेळावा लाभदायक ठरणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत स्वतःचे हक्काचे घर नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सुलभ व कमी व्याजदरात कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रतेचे निकष व अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून लाभार्थ्यांची नोंदणी करून घेणार असून त्यांच्या अडचणी व शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन तपसे करमाळा नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago