Categories: करमाळा

कोर्टी जि.प. गटात भाजप–राष्ट्रवादी मित्र पक्ष युतीचा प्रचार दौरा* *मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोशल मीडिया प्रमुख गणेश कराड यांचा मतदारांशी संवाद


करमाळा प्रतिनिधी कोर्टी जिल्हा परिषद गटातील भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपाचे राज्यस्तरीय मीडिया प्रमुख श्री. गणेश कराड यांनी प्रचार मैदानात उतरून जोरदार संपर्क दौरा केला. यावेळी भाजप किसान सेलचे नेते जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर हेही त्यांच्या समवेत उपस्थित होते.
या दौऱ्यात जिल्हा परिषद कोर्टी गटातील उमेदवार सौ. वनिता सुभाष गुळवे, पंचायत समिती केत्तूर गणातील उमेदवार ॲड. अजित विघ्ने तसेच पंचायत समिती कोर्टी गणातील उमेदवार श्री. नाना झाकणे यांच्या प्रचारासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यात आल्या. मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा घेण्यात आला तसेच स्थानिक प्रश्न, अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.
यावेळी बोलताना श्री. गणेश कराड म्हणाले की, भाजप–राष्ट्रवादी मित्र पक्ष युतीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, सुशिक्षित, अभ्यासू व कार्यकुशल उमेदवार दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हे उमेदवार सदैव उपलब्ध राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नरेंद्रसिंह ठाकुर यांनीही यावेळी शेतकरी, युवक व महिलांसाठी राबणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. “विकासाची घडी बसवण्यासाठी आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे त्यांनी मतदारांना सांगितले.
या प्रचार दौऱ्याला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचारादरम्यान भाजप–राष्ट्रवादी मित्र पक्ष युतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago