Categories: करमाळा

मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींसह विधवा महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम* *नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम*श


करमाळा प्रतिनिधी मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक स्वरूपात सुवासिनी महिलांसोबतच विधवा महिलांनाही सन्मानपूर्वक हळदी-कुंकू देऊन त्यांचा सामाजिक सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे कार्यक्रमस्थळी समाधान, आनंद व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हळदी-कुंकूचे कार्यक्रम सर्वसाधारणपणे सुवासिनी महिलांसाठी आयोजित केले जातात; मात्र विधवा महिलांनाही सण-उत्सवांच्या आनंदात सहभागी करून घेणे, त्यांना समाजात सन्मानाची वागणूक देणे ही आजच्या काळाची गरज आहे. नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांनी घेतलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असून समाजाला नवी दिशा देणारा आहे. या कार्यक्रमात विधवा महिला भगिनी शकुंतला जाधव यांच्यासह उपस्थित सर्व विधवा भगिनींना हळदी कुंकूवाचा मान देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महिला भगिनींना वाण म्हणून विठ्ठल रुक्मिणीची मुर्त्या भेट म्हणून देण्यात आल्या.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत, सौ कोमल घुमरे प्रियांका बागल,नगरसेविका सौ. चैताली सावंत यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. त्यामध्ये सौ. निमा फंड, सौ. लता घोलप, सौ. साधना घोलप, सौ. सिंधू घोलप, सौ. तृप्ती घोलप, मांडवे मॅडम, कानडे मॅडम, योगिता बुलबुले, सौ. योगिता लोकरे, सौ. सुनीता शिगची,अनुराधा शिगची, सौ. रचना लुंकड, सौ.वैशाली शियाळ, अनिता किरवे यांचा समावेश होता . वैद्यकीय क्षेत्रातील डॉ उर्मिला जाधव डॉ मंजिरी नेटके, डॉ सारिका लोकरे डॉ योगिता पवार डॉ निशा सारंगकर डॉ वैशाली घोलप डॉ वैशाली कुलकर्णी डॉ अर्पणा भोसले,डॉ. मोहिनी वीर या उपस्थित होत्या.
यांच्यासह सौ. अर्चना फंड, सौ. शीतल फंड, रोहिणी फंड, सौ. कोमल चांदगुडे, सौ. कोमल फंड, सौ. मीरा फंड, सौ. भाग्यश्री फंड, सौ. मयुरी फंड, सौ. मीना फंड, सौ. अलका फंड, सौ. अर्चना अंकुशखाने, प्रेमा अग्रवाल, सौ. सिंधू पवार, सौ. शोभा इंदलकर साने मॅडम सौ. संध्या कट्टिमणी, सौ. संध्या काळे, अश्विनी टांगडे, सौ. चंद्रकला क्षीरसागर, सौ. संगीत क्षीरसागर, सौ. अश्विनी वीर, सौ. लता वीर, सौ. मोहिनी वीर, मोनिका चौधरी, सौ. मनिषा मोरे, सौ. अक्षरा चाळक, सौ. अक्षरा दळवी, अमृता फंड, सुवर्णा मडके, अंबिका सूर्यवंशी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक एकात्मता वाढत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक सौ. स्वातीताई फंड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago