Categories: करमाळा

राज्यात केंद्रात आपले सरकार असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली वांगी परिसरातील मूलभूत विकासाला गती मिळणार – विलासराव घुमरे सर

. करमाळा प्रतिनिधी.
राज्यात केंद्र व राज्यात आपलेच सरकार असून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी व परिसरातील मूलभूत विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास विद्या विकास महामंडळाचे सचिव व मार्गदर्शक श्री. विलासराव घुमरे यांनी व्यक्त केला.
वांगी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रचाराचा नारळ फोडून औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. घुमरे पुढे म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी नियोजन यांसारख्या जनतेच्या दैनंदिन गरजांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय घेतले जात असून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, माजी आमदार संजय शिंदे तसेच भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा पुढे नेण्यात येणार असून येत्या ५ तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ व घड्याळ या चिन्हासमोरील अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात शहाजी दादा देशमुख, कल्याण सरडे, चंद्रहास बापू निमगिरे, शिवाजीराव बंडगर, उमेदवार सोनालीताई नितीन तकीक व डॉ. विजय रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन आबा तकीक यांनी केले, तर नितीन तकीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago