Categories: करमाळा

कामाचा माणूस असणाऱ्या ॲड. अजिनाथ विघ्ने यांना निवडून द्या – ॲड. रविंद्र कोकरे

करमाळा  प्रतिनिधी 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या करमाळा तालुक्यात जोरात सुरू आहे. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असल्याने सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांची जाण असणारे आणि ते प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खातगाव येथील ॲड. रविंद्र कोकरे यांनी केले.
खातगाव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पदासाठी सौ. वनिताताई सुभाष गुळवे व पंचायत समिती सदस्य पदासाठी ॲड. अजिनाथ विघ्ने यांच्या उमेदवारीला खंबीर पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ॲड. कोकरे म्हणाले की, “लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेले ॲड. अजिनाथ विघ्ने हे अभ्यासू, तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले आणि कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांची कार्यपद्धत, प्रशासनाविषयीचा अभ्यास आणि सामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे या मतदारसंघाला एक सक्षम आणि जबाबदार उमेदवार मिळाला आहे.”
तसेच बारामती ॲग्रोच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुभाष आबा गुळवे यांनी केलेली विकासकामे ही सौ. वनिताताई गुळवे यांच्या उमेदवारीची मोठी जमेची बाजू असल्याचेही त्यांनी सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“सामान्य जनतेचा विश्वास, विकासकामांचा अनुभव आणि सक्षम नेतृत्व या बळावर हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील,” असा विश्वास ॲड. रविंद्र कोकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
या वेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आगामी निवडणुकीत ही जोडी यशस्वी ठरेल, असा सूर परिसरात दिसून येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago