Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात राजकीय भूकंप माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा भाजप–राष्ट्रवादी युतीला बिनशर्त पाठिंबा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच अधिकृत घोषणा

करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याच्या राजकारणात शनिवारी मोठी उलथापालथ झाली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा असून, येत्या दोन दिवसांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत याची अधिकृत घोषणा होणार आहे. या घडामोडीमुळे करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर अक्षरशः भूकंप झाल्याचे चित्र आहे.
या राजकीय हालचालींचे केंद्र ठरले बार्शी. माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पुढाकाराने बार्शीतील लक्ष्मी सोपान मार्केट येथे माजी आमदार जयवंतराव जगताप व रश्मी बागल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जगताप गटाने भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयानंतर करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे व रश्मी बागल यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपण तटस्थ राहणार असून मतदारांनी योग्य उमेदवाराला मतदान करावे, अशी भूमिका जाहीर केली होती. या अनपेक्षित घोषणेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या संधीचे महत्त्व ओळखून जगताप यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पुढाकाराने जगताप, शिंदे व बागल गटात समेट घडून आल्याचे सांगितले जाते.
या राजकीय ऐक्यामुळे करमाळा तालुक्याचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलले असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीचे पारडे जड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. जगताप यांच्या निर्णयाचा थेट लाभ युतीच्या उमेदवारांना होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात समविचारी नेत्यांचे समन्वयक म्हणून ओळख असलेले माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संमतीने माजी आमदार संजयमामा शिंदे, रश्मी बागल आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्यात त्यांना यश आले आहे. परिणामी, जिल्ह्याच्या राजकीय राजधानीचे आणि समन्वयाचे केंद्र म्हणून बार्शी नव्याने उदयास येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी हालचाली वेग घेण्याची शक्यता असून, सर्वांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

16 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

22 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago