करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणामध्ये जवळपास 90 टक्के च्या आसपास पाणीसाठा झाल्यामुळे ओव्हर फ्लो चे आवर्तन सुरू करणे प्रस्तावित आहे. आवर्तन सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. तसेच दुपारी बोगद्याच्या कामकाजाची पाहणी केली.
दहिगाव ही उपसा सिंचन योजना असल्यामुळे या योजनेला अनेक मर्यादा पडतात . आवर्तन कालावधीत अनेक अडथळे येतात त्यामुळे आ.शिंदे यांनी दहीगाव व कुंभेज येथील पंपगृह व परिसर याची पाहणी केली. तसेच वितरणकुंड क्र. 2 , खडकेवाडी ते घोटी या मुख्य कॅनॉलवरच्या सौदे , सरपडोह , वरकटने , फिसरे ,घोटी , साडे इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेतल्या . सोलापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत कुकडी डावा कालवा क्र.12 च्या माध्यमातून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कामकाज चालते. या योजनेसाठी यांत्रिकी विभाग , जलविद्युत विभाग व स्थापत्य विभाग या तीनही विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबरच महावितरणचे उपअभियंता यांच्याशी आमदार शिंदे यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व आवर्तन कालावधीत विनाअडथळा आवर्तन पार पडण्याच्या सूचना केल्या.
दुपारी कृष्णा मराठवाडा महामंडळांतर्गत मराठवाड्याला पाणी देण्यासाठी उजनी ते कोळगाव धरण यादरम्यान करमाळा तालुक्यात बोगद्याचे काम सुरू आहे. जेऊर, सरपडोह ,सौंदे , शेलगाव ,अर्जुननगर याठिकाणी या बोगद्याच्या शाफ्ट आहेत . यापैकी अर्जुननगर या शाफ्टला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली तसेच प्रत्यक्षात बोगद्यामध्ये खाली उतरून कामकाजाची पाहणी केली.
याप्रसंगी सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव , कुकडी डावा कालवा क्रमांक 12 चे उपविभागीय अभियंता सी.ए .पाटील , जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे मॅडम , उपअभियंता राऊत तसेच यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव , उपअभियंता सूळ , महावितरण विभागाचे गलांडे या अधिकारी व कर्मचारी वर्गासह चिखलठाणचे सरंपच चंद्रकांत सरडे , विलास दादा पाटील, तानाजी बापु झोळ ,उद्धव दादा माळी , चंद्रहास बापु निमगिरे ,तात्यासाहेब मस्कर , वामनदादा बदे ,मानसिंग खंडागळे , दत्ता जाधव , बाळासाहेब जगताप ,विलास काका राऊत, राजेंद्र पवार , दत्तात्रय अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…