Categories: करमाळा

विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यिकांना आवाहन – सोमनाथ टकले

करमाळा प्रतिनिधी ग्रामीण जीवन, लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या मराठी साहित्यास प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा तरुण मंडळ वडशिवणे यांनी यावर्षीही गावगाडा साहित्य पुरस्कार देणार असल्याचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी जाहीर केले. हा पुरस्कार सोळावा वर्ष साजरा करीत असून यासाठी साहित्यिकांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
यावर्षी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित कथासंग्रह पुरस्कारासाठी पात्र असतील. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, लेखकाचा अल्पपरिचय आणि छायाचित्र पाठवावे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी आपले साहित्य १० मार्च २०२६ पर्यंत पाठवावे.
सोमनाथ टकले यांनी सांगितले की, हा पुरस्कार ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास आणि नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरतो. यापूर्वी हा पुरस्कार भागवत बावळे (२०११), प्रा. डॉ. अर्जुन होटकर (२०१२), . कल्पना दुधाळ (२०१३), पार्थ पोळके (२०१४), सतीश दराडे (२०१५), ऐश्वर्य पाटेकर (२०१६), रावसाहेब कुंवर (२०१७), तुकाराम पाटील (२०१८), दिनकर कुटे (२०१९), जयदीप विघ्ने (२०२०), हरिश्चंद्र पाटील (२०२१), डॉ. कालिदास शिंदे व बाबुराव इंगळे (२०२२), तान्हाजी बो-हाडे (२०२३), प्रकाश सोनाळकर (२०२४) आणि मारोती मानेमोड (२०२५) यांसारख्या मान्यवर साहित्यिकांना प्रदान करण्यात आला आहे.
साहित्यिकांनी आपले साहित्य पुढील पत्त्यावर पाठवावे –
सोमनाथ मधुकर टकले, मु. पो. वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर – ४१३२२३.
मो. ९६९९७६०८०२.
यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ आणि बाबुराव इंगळे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago